पुणे : प्रतिनिधी
माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कौटुंबिक कारणाने उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या उषा काकडे यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कौटुंबिक कारणाने उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या उषा काकडे यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
उषा काकडे यांनी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कौटुंबिक कारणाने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र रुबीहॉल हॉस्पिटलचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी उषा काकडे यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती दिली आहे. सध्या उषा काकडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
राजकीय पार्श्वभूमी असूनही उषा काकडे यांनी सामाजिक कार्याच्या वर्तुळात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उषा काकडे या प्रसिद्ध उद्योजिका आणि ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापक असून त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. महिला आणि बालकांसाठी त्या ग्रॅव्हिटस फाउंडेशनद्वारे काम करतात.
माजी खासदार संजय काकडे हे मुळचे बांधकाम व्यवसायिक आहेत. ‘संजय काकडे ग्रुप’ या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी १९८६ पासून रिअर इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठे काम केले आहे. देवेंद्र फडणवीसांनी यांनी २०१७ मध्ये संजय काकडे यांच्यावर पुणे महानगर पालिकेची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासून संजय काकडे यांनी राज्यभर ओळख झाली. संजय काकडे यांनी पुण्यात भाजपाला विजय मिळवून दिल्यावर त्यांची राजकीय अभ्यासक म्हणून ओळख निर्माण झाली. त्यानंतर २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आणि तीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे संजय काकडे यांना पक्षाने राज्यसभेवर जाण्याची संधी दिली होती.