30.7 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeलातूरमाजी मंत्री अमित देशमुख, चेअरमन वैशालीताई देशमुख यांचे संचालकांनी मानले आभार

माजी मंत्री अमित देशमुख, चेअरमन वैशालीताई देशमुख यांचे संचालकांनी मानले आभार

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मुख्य प्रतोद विधीमंडळ काँग्रेस, महाराष्ट्र विधानसभा, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षीक निवडणूक विलासराव देशमुख सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणुक लढवली गेली. या निवडणुकीत विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणीपासूनची सभासदाच्या हिताची वाटचाल पाहता सर्व सभासदांनी ही निवडणुक बिनवीरोध निवडूण दिली आहे. दि. १४ एप्रिल रोजी दुपारी विलास सहकारी साखर कारखान्याच्या सर्व नवनीर्वाचीत संचालकांनी बाभळगाव निवासस्थानी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि चेअरमन  श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आ­णि आभार मानले.
यावेळी माजी आमदार वैजनाथराव शिंदे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, रणजित राजेसाहेब पाटील, अनंत व्यंकटराव बारबोले, रसूल दिलदार पटेल, तात्यासाहेब छत्तू पालकर, गोवर्धन मोहनराव मोरे, हणमंत नागनाथराव पवार, नरसिंग दगडू बुलबुले, नेताजी शिवाजीराव साळुंके (देशमुख), नितीन भाऊसाहेब पाटील, रामराव विश्वनाथ साळुंके, अमृत हरिश्चंद्र जाधव, सतीश विठ्ठलराव शिंदे (पाटील), दीपक अर्जुन बनसोडे, लताबाई रमेश देशमुख, शाम भारत बरुरे, सुभाष खंडेराव माने व रमेश देशमुख आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR