लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ निलंगा या ठिकाणी प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ फीत कापून करण्यात आला. यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ.शिवाजी काळगे, अजित माने, डॉ. अरविंद भाताब्रे, पंकज शेळके, अविनाश रेशमे, आबासाहेब पाटील, दयानंद चोपणे, अजित नाईकवाडे यांच्यासह कमिटी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.