लातूर : प्रतिनिधी
बुधवार दि. ४ सप्टेंबर २४ राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज बुधवार दि. ४ सप्टेंबर २४ लातूर तालुक्यातील कातपूर, चाकूर तालुक्यातील घरणी, देवणी तालुक्यातील जवळगा येथे भेट देऊन, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांच्या पिकांची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. शासन आणि प्रशासनाने या संकटात शेतक-यांच्या पाठीशी उभे रहावे. लवकरच सर्व पंचनामे पूर्ण करून शेतक-यांना मदत पुरवली जावी अशी मागणी त्यांनी केली.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर तालुक्यातील कातपूर येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बाळकृष्ण देशमुख, शेतकरी हनमंत देशमुख, शेतकरी उत्तम पडवळ यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. देवणी तालुक्यातील जवळगा येथील अतिवृष्टीमुळे व मांजरा नदीचे पाणी शेतात घुसल्याने नुकसान झालेल्या शेतकरी दयानंद मुळजे शेतकरी राम त्र्यंबक गजबा यांच्या शेतातील बांधावर जाऊन उडीद, तुर, ऊस, सोयाबीन पिकाची पाहणी करून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्ताना सरसकट मदत करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर आमदार देशमुख यांनी पंचनामे प्रक्रिया त्वरीत करून शेतक-यांना शासकीय मदत उपलब्ध करून देण्याचीही्र मागणी सरकारकडे केली. यावेळी कातपूर येथे लातूर तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, मंडळ कृषी अधिकारी राजू येवले, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
तर घरणी येथे माजी मंत्री विनायकराव पाटील, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक एन. आर. पाटील, चाकुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास पाटील चाकूरकर, चाकूर तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी शिरीष खंदाडे, प्रकाश पाटील, कृषी प्रव्यवेक्षक बालाजी घोडके कृषी सहाय्यक भाग्यश्री उगीले तलाठी बालाजी हाके, चंद्रकांत मद्दे, सिराजुद्दीन जहागीरदार, निळकंठ मिरकले, शिवाजी बैनगिरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चाकूर तालुकाप्रमुख नंदकुमार पवार, अंगद पवार, टवेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, अण्णासाहेब पाटील निलेश देशमुख, अनिल चव्हाण, भागवत फुले तर देवणी तालुक्यात पाहणी करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंके, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अरंिवद भातांब्रे, माजी सभापती अजित माने, देवणीचे उपनगराध्यक्ष अमित मानकरी, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, आबासाहेब पाटील उजेडकर, महेश देशमुख, देवणी तालुका कृषी अधिकारी संजय पाटील, कृषी सहाय्यक अण्णासाहेब बंडगर, कृषी सहाय्यक दत्तात्रय गुणाले, कृषी पर्यवेक्षक विनायक सूर्यवंशी, चक्रधर शेळके, वैजनाथ डुल्ले, ज्ञानेश्वर पाटील, अनिल पाटील, बसवराज मठपती, बाळासाहेब पाटील, शिवराज धुमाळ आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी संबंधित
वभागाचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.