लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी बार्शी रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था(मुलींची) येथील छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण व मानव विकास, संशोधन संस्था (सारथी) पुणेचे लातूर विभागीय कार्यालय व वसतिगृह अभ्यासिका ग्रंथालय प्रशिक्षण केंद्र हॉलच्या इमारत बांधकामांची पाहणी करून संबंधितांना काम वेळेत व गुणवत्तापूर्ण करण्याच्या त्यांनी सूचना केल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग लातूरचे अधीक्षक अभियंता सलीम शेख, कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, उपअभियंता राजेंद्र बिराजदार, ओमकार कन्स्ट्रक्शनचे योगेश पाटील, हमीद शेख, शाखा अभियंता सिद्धांत शिंदे, स्थापत्य सहाय्यक श्रीकांत धिमधिमे आदी उपस्थित होते.