लातूर : प्रतिनिधी
लातूर विधानसभा मतदार संघ आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील कॉग्रेस महाविकास आघाडी उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि आमदार धिरज विलासराव देशमुख हे उद्या दि. २९ ऑक्टोंबर रोजी शहरातून भव्य मिरवणवूकीने जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार असून दुपारी १ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभाची सभा होणार आहे.
राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या संपूर्ण मतदार संघात प्रचाराची फेरी पुर्ण केली असून सर्व समाजातील नागरीकांच्या भेटीगाटी घेतल्या आहेत. विविध संस्था व संघटनांच्या पदाधिकारी यांच्याकडे जावून त्यांच्याशी विचार विनिमय केला आहे. महाविकास आघाडीतील पदाधिक-यांशी चर्चा करुन एकजूटीने प्रचार यंत्रणा राबवण्या बाबत चर्चा केली आहे. सर्वांनी त्यांना एकमुखी पांठीबा दिला आहे.
मंगळवारी सकाळी सर्व ग्राम देवतांचे दर्शन आणि महापुरुषांना अभिवादन करुन आमदार अमित विलासराव देशमुख आणि आमदार धिरज विलासराव देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करतील, लातूरचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गंजगोलाई येथे आई जंगदंबचे दर्शन करुन आरती करुन मिरवणूकीला सुरुवात होईल. सदरील पदयात्रा गंजगोलाई येथून हनुमान चौक, कॉग्रेस भवन, महात्मा गांधी चौक, महात्मा फुले पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे पोहचेल. मिरवणूक महामार्गावरील सर्व महापुरुषांना अभिवादन करुन त्यानंतर दुपारी १ वाजता महाविकास आघाडी नेत्यांच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभ सभा होईल.
या प्रचार शुभारंभ सभेस व पदयात्रेस मोठया संख्येने जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, रा्ष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, शिवसेनेचे सुनील बसपूरे, शेतकरी कामगार पक्षाचे भाई उदय गवारे, कम्युनीष्ठ पार्टीचे संजय मोरे, आम आदमी पार्टीचे प्रदिप भोसले सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी केले आहे.