19.2 C
Latur
Tuesday, November 12, 2024
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांची जनसंपर्क अभियानांतर्गत शनिवारी सायंकाळी शहरातील प्रभाग १०, ११ व १२ येथे भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुरुष, महिला, युवक, युवती मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांकडून फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. लातूर शहराच्या ५ नंबर चौकातून सायंकाळी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचार रॅलीला प्रारंभ
झाला.
अनेक घरांच्या छतावरून रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.हातात फलक, झेडे घेऊन मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते. ही भव्य रॅली एकमत चौक (५ नं. चौक) चौधरीनगर, संविधान चौक, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीपासून अग्रोयानगर, पंचशील चौक, बोधी चौक ते साई मंदिर, गगन विहार चौक, विठाई सुपर मार्केट डावी बाजू मरे यांच्­या घरापासून श्यामनगर, अमलपूर, बजरंग चौक, जिजामाता चौक, भैरवनाथ मंदिरमार्गे बाजीराव चौक, पाणंद रोडमार्गे सुग्रे किरणा दुकानासमोरून एल. आय.सी. ऑफिस येथे सदरील रॅलीचा समारोप करण्यात आला.
या वेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे लातूर शहर विधानसभा प्रभारी आमदार फुरखान अहेमद, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, सूर्यकांत कातळे, राम कोंबडे, सतीश साळुंखे, गोटू यादव, कमलाताई शहापुरे, सचिन पाटील, डॉ. बालाजी साळुंखे, बालाजी मुस्कावाड, सुधाकर साळुंखे, संजय ओहळ, विकास वाघमारे, बबन देशमुख, मोहन सुरवसे, व्यंकटेश पुरी, राम स्वामी, भालचंद्र सोनकांबळे, पवन सोलंकर, अकबर माडजे, आकाश भगत, रत्नदीप अजनीकर, कांचन अजनीकर,  कल्पनाताई मोरे, सुमन चव्हाण, सुकेश गोडबोले, हरिओम भगत, व्यंकटराव शिंदे, जीवन सुरवसे, कुणाल येळीकर, महादेव बरूरे, दीपक राठोड, सायरा पठाण, अनिता कांबळे, लता काळे, शोभा ओहळ, मंदाकिनी शिखरे आदींसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या
होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR