लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतीक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीलाभेट देऊन संचालक मंडळाकडून कामकाजाचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना केल्या.
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या चालू असलेल्या कामासह शेतमालाची दैनदीन आवक, मिळत असलेला भाव व दैनदीन कामाची माहीती घेतली, येथील कामाच्या संदर्भात संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडिले, प्रभारी सचिव अरविंद पाटील, संचालक सर्वश्री अनिल पाटील, श्रीनिवास शेळके, शिवाजी कांबळे, सुभाष घोडके, अनंत पवार, सचिन सूर्यवंशी, बालाजी वाघमारे, बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, युवराज जाधव, लक्ष्मण पाटील, बळवंत पाटील, आनंद पाटील, तुकाराम गोडसे, शिवाजी देशमुख, आनंद मालू, अभय शहा आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.