20.6 C
Latur
Sunday, February 2, 2025
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते जगदंबा इडली सेंटरचे उद्घाटन

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते जगदंबा इडली सेंटरचे उद्घाटन

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी लातूर शहरातील गूळ मार्केट भागात काँग्रेस पदाधिकारी महादेव उबाळे यांच्या जगदंबा इडली सेंटरच्या तिस-या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेन्टी-वन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते अ‍ॅड. उदय गवारे, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, प्रो. प्रा. शहाजी उबाळे, व्यंकट उबाळे, सत्तार शेख, गोविंद पाटील, मुक्तार शेख, लालासाहेब चव्हाण, रमेश सूर्यवंशी, शिवाजी कांबळे, लक्ष्मण मोरे, मतीन सय्यदअली,  सय्यद साजिद, बालाजी पवार, एकनाथ भोसले, सय्यद अशादुल्ला, साजिद शेख, बाळासाहेब वीर, आदीसह उबाळे कुटुंबीय मित्रपरिवार काँग्रेस पक्षाचे  पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये जगदंबा इडली सेंटरची शाखा सुरु झाली आह. महादेव उबाळे यांनी तेरा वर्षाच्या वयापासून या व्यवसायाला सुरुवात केली. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या जगदंबा इडली सेंटरमध्ये पौष्टिक पदार्थ नागरिकांना खायला मिळतील. लातूर ग्रामीणमधून इंदरठाणा गावातून आलेला एक आमचा साथी हा व्यवसाय करतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
जगदंबा इडली सेंटरच्या लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात शाखा सुरु झाल्या पाहिजेत तसेच मराठवाड्यातदेखील आशा शाखा सुरु कराव्यात. लातूरची एक परंपरा आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूरमध्ये एक संस्कृती निर्माण केली. लातूरमध्ये अनेक लोक व्यवसायाच्या निमित्ताने येतात आणि आपली प्रगती करतात. लातूर शहराला दिली जाणारी वाढती पसंती आणि वाढती गर्दी हे प्रगतीचे लक्षण आहे.  लातूरच्या भरभराटीला कोणीही रोखू शकणार नाही जगदंबा इडली सेंटर हा ब्रँड तयार होऊन त्याच्या फ्रँचाईजी इतरत्र दिल्या जाव्यात असे म्हणत त्यांनी उबाळे कुटुंबीयांना पुढील व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा दिल्या . माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त करुन उबाळे कुटुंबियांना पुढील व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक जगदंबा इडली सेंटरचे संचालक महादेव उबाळे यांनी करुन व्यवसायाची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याती शिवलीला कानडे यांनी केले तर शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार सय्यद अशदुल्ला यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR