22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते द बॅटल स्क्वेअर टर्फचा शुभारंभ

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते द बॅटल स्क्वेअर टर्फचा शुभारंभ

लातूर : प्रतिनिधी
क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्याच्या अनेक संधी आता निर्माण झाल्या आहेत, याचा प्रत्यय देत लातूर येथील सुमुख गोविंदपूरकर, हर्षद मुंडे आणि संस्कार मुंडे या तीन युवा मित्रांनी मिळून शहराच्या जुन्या एमआयडीसी परिसरात  सुरु  केलेल्या द बॅटल स्क्वेअर टर्फ  या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उपस्थित राहून शुभारंभ केला.  द बॅटल स्क्वेअर टर्फ’  स्थानिक खेळाडूंसाठी निश्चितपणे उपयुक्त  ठरेल, असा विश्वास  यावेळी व्यक्त  केला.
क्रीडा क्षेत्रात आपले करिअर करणा-या  खेळाडू करीता उपयोगी ठरणा-या द बॅटल स्क्वेअर टर्फची लातुर शहरातील कळंब रोड भागात सुरुवात करण्यात येत असून राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. २६ जानेवारी  रोजी शुभारंभ करण्यात आला. लातुरमधील युवकांना त्यांच्या वेळेनुसार खेळता यावे यासाठी हे टर्फ  सुरुकेले आहे. या ठिकाणी क्रिकेट सोबत टेनिस, व्हॉलीबॉल, फुटबॉल खेळण्यासाठीचीदेखील व्यवस्था केली जाणार अशी संकल्पना असून या क्लबची क्रिकेट खेळापासून  सुरुवात करण्यात आली आहे. ५२ बाय १०० आकाराचे द बॅटल स्क्वेअर टर्फ क्लब हे लातूर मधील सर्वांत मोठे एकमेव क्रिकेट सराव टर्फ आहे. यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी टर्फ मध्ये  क्रिकेटचा आनंद घेतला. यावेळी बोलताना माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की, लातुरमध्ये खेळाडू करिता, असे स्टेडियम आहेत पण शहराला आशा अनेक स्टेडियमची गरज आहे.हा क्लब नक्कीच खेळाडूंना उपयुक्त ठरेल असे म्हणत या टर्फ क्लबला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना अशोक गोविंदपूरकर, सुधीर धुत्तेकर, मोहन माने, रविशंकर जाधव यांनी मनोगत व्यक्त्त करताना द बॅटल स्क्वेअर टर्फ क्लबला शुभेच्छा दिल्या.
 यावेळी  रवींद्र काळे, समद पटेल, रविशंकर जाधव,  गणेश एस. आर.देशमुख, सुमुख गोविंदपुरकर, हर्षद मुंडे, संस्कार मुंडे, वसंत देशपांडे, समद पटेल, इम्रान सय्यद, व्यंकटेश पुरी, सुनील आयाचित, संजय निलेगावकर, सपना किसवे, स्वयंप्रभा पाटील, संजय पांडे, डॉ. रमेश भराटे, बसवंतअप्पा भरडे, कुणाल वांगज, प्रमोद जोशी, अरविंद कांबळे यांच्यासह गोविंदपुरकर व  मुंडे मित्रपरिवार मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR