लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी लातूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार सौद्यात जाऊन झेंडा पूजन करुन सर्व शेतमालाचा सौदा सुरु केला. यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील पडीले, लातूर दाळमिल असोसिएशनचे अध्यक्ष हुकुमचंद कलंत्री, बी. एस. पवार, संचालक लक्ष्मण पाटील, आनंद पाटील, अनिल पाटील, शिवाजी देशमुख, सचिव भगवान दुधाटे, सहसचिव सतीश भोसले, सहसचिव भास्कर शिंदे, संचालक बालाप्रसाद बीदादा, युवराज जाधव, शिवाजी कांबळे, तुकाराम गोडसे, श्रीनिवास शेळके, सुधीर गोजमगुंडे, अजय शहा, आनंद मालू, अशोक अग्रवाल, सुरेश धानुरे, प्रवीण सूर्यवंशी,
अरविंद पाटील, सचिन सूर्यवंशी, गणेश एसआर देशमुख, लातूर आडत असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महेश जाधव, हर्षवर्धन सवई, सुधीर बोरुळे आदीसह लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडते, व्यापारी, गुमास्ता हमाल, मापाडी, खरेदीदार शेतकरी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सोयाबीन सौद्याला उपस्थित राहून बाजाराची पाहणी करुन विविध आडतेशी सध्याची शेतमालाची आवक, सध्याचा बाजार भाव आदी विविध विषयावर त्यांच्याशी संवाद साधून बाजार समितीच्या विकास कामासंदर्भात संबंधितांना आवश्यक सूचनाही केल्या.