लातुर प्रतिनिधी :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज बुधवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या निवेदनाचा व निमंत्रणाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या. तसेच माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रचार यंत्रणा गतिमान करण्याच्या काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना केल्या.
याप्रसंगी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, व्हा. चेअरमन विजय देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे बसवराज पाटील नागराळकर,
माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशलेष मोरे, महेश जाधव, विशाल काणेकर, विजयकुमार धुमाळ, राजा माने, भारत जोडो निर्भय बनो आंदोलनाचे लातूर जिल्हा समन्वयक प्रा.सुधीर अनवले, राजकुमार होळीकर, गणपत पाटील, सुपर्ण जगताप, प्रा. अर्जुन जाधव, लक्ष्मण बोराडे, गणी मिस्त्री शेख, सचिन बंडापले, गिरीश पाटील, गोटू यादव, रोहित दयाळ आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
—-