21.9 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधून डॉ. शिवाजी काळगे यांना...

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधून डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करण्याचे केले आवाहन

लातूर : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी लातूर शहरातील बस स्टॅन्ड पाठीमागील गांधी मार्केट नसीर मोहम्मदसाब शेख पानवाले यांच्या पान आडत दुकानाला भेट देऊन, गांधी मार्केट येथील व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या, तसेच लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा,
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर शहर
विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे निरीक्षक सर्जेराव मोरे, विलास
को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, गांधी मार्केट व्यापारी
असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत आळंदकर, सचिव ज्ञानोबा पेटकर, मोईनसाब,
युनूस मोमीन, सचिन बंडापले, व्यंकटेश पुरी, पुनित पाटील, उदय कोटलवार,
अनिल जवाधवार, आकाश गायकवाड, गौसोद्दीन शेख, सुरेश पांचाळ आदीसह काँग्रेस
पक्षाचे विविध पदाधिकारी गांधी मार्केट चे व्यापारी उपस्थित होते.

संसदेत बोलण्यासाठी चांगला शिकलेला माणूस आवश्यक असतो लातूर लोकसभा
मतदारसंघाचे महावीकास आघडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे
डॉक्टर उच्च शिक्षित सुसंस्कृत आहेत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत
अशी गांधी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी ग्वाही दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR