लातूर : प्रतिनिधी
जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी आशियाना निवासस्थानी भेटी घेतल्या. विविध विषयवार चर्चा केली. सध्या उसाचे गाळप सुरु असल्याने त्यावर चर्चा केली. यावेळी लातूर शहर, लातूर तालुका, उदगीर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ देवणी, निलंगा, औसा, चाकुर अहमदपूर तालुक्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सोसायटीचे चेअरमन, उस उत्पादक शेतकरी सामान्य नागरिक दिलीपराव देशमुख यांना भेटले. अनेक निवेदनावर तात्काळ प्रश्नांची सोडवणूक केली.
यावेळी माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, उदगीर बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे,उदगीर तालुका काँग्रेस अध्यक्ष कल्याण पाटील, डी एन शेळके, इंदिरा सूतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, शैक्षणीक संस्था संघटनेचे रामदास पवार, संतोष देशमुख, संचालक शंकर बोळंगे, धनराज दाताळ, बाबुराव जाधव, रमेश सोनवणे, विभिषन सांगवीकर, साळुंखे, पवार, सचिन दाताळ, अनुप शेळके, राजकुमार पाटील, हरिराम कुलकर्णी, आयुब पठाण, रईस शेख, अब्दुला शेख, राजे भोसले, मदन भिसे, राजाभाऊ मोरे, इम्रान शेख आदी उपस्थित होते.