लातूर : प्रतिनिधी
माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. १७ एप्रिल रोजी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची आशियाना निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, राजेंद्र मोरे, सत्तार पटेल, अरुण कुलकर्णी, प्रज्योत हुडे, अशोक दहिफळे, प्रताप पाटील, नवनाथ शिंदे, नाना पाटवदकर, संपत गायकवाड, अर्चना माने, रुकसाना पटेल, संघर्ष दिव्यांग संस्थेचे शंकर सर्जे, पूजा सर्जे, सुमनताई कांबळे, सुरेखा आयवळे, मारुती कसबे, सावन गवळी, सचिन कसबे, प्रवीण गायकवाड आदी जण उपस्थित होते.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली. आज त्यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाचे औचित्य साधून मांजरा परिवारातील साखर कारखान्यानी ३ हजार रुपये भाव देत अनोखी भेट देताना शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा केल्याने शेतक-यांत आनंद ओसंडून वाहत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांचे हीत हेच दिलीपराव देशमुख यांचे अंतिम ध्येय असल्यामुळे ख-या अर्थाने ते चळवळीचे वास्तवरुपी अव्यक्त आधारवड आहेत, असे यावेळी बोलताना राजीव कसबे यांनी सांगीतले.