36.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस माने परिवाराने केला साजरा

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस माने परिवाराने केला साजरा

लातूर : प्रतिनिधी
माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दिलीप माने व माने परिवाराच्या वतीने येथील साई फार्म हाऊस येथे आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करणयात आला. यावेळी स्नेह भोजनाचाही कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमास सौ. सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख तसेच शहरातील प्रतिष्ठीत कंत्राटदार, आप्तेष्ठ, डॉक्टर्स,्र मित्र परिवार उपस्थित होता. माने परिवाराच्या वतीने केक कापून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिलीप माने यांच्या कार्याचे कौतुक केले.  यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. दिलीप माने यांनी यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या गेल्या ४० वर्षांतील विशिष्ठ घटनांचा उल्लेख केला.   यावेळी कवी योगीराज माने यांनी सूत्रसंचालन केले. माने परिवाराच्या वतीने डॉ. रमा रितेश माने यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR