27.8 C
Latur
Saturday, August 23, 2025
Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते नाभिक समाजातील गुणवंतांचा सत्कार

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते नाभिक समाजातील गुणवंतांचा सत्कार

लातूर : प्रतिनिधी
संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने दि. २० ऑगस्ट रोजी आयोजित नाभिक बांधवांच्या स्नेह मेळाव्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा लातूरचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली वीरशैव सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या स्नेह मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, सुतार समाजाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पांचाळ, परिट समाजाचे अध्यक्ष रंगनाथ घोडके, भटके विमुक्त समाजाचे हरिभाऊ गायकवाड, बारा बलुतेदार महासंधाचे अध्यक्ष अजित निंबाळकर, कुंभार समाजाचे अध्यक्ष वैजनाथ कुंभार यांची उपस्थिती होती.
या स्नेह मेळाव्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. तर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते नाभिक समाजातील गुणवत्ां विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेस पक्षाकडून बारा बलुतेदारांना योग्य संधी देण्यात येईल, असा शब्द यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिला. प्रास्ताविक भाऊसाहेब शेंद्रे यांनी केले. माधव लोंढे यांनी सूत्रसंचालन तर मनोज वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल सावंत, जगन्नाथ गवळी, नारायण महाबोले, बालाजी सूर्यवंशी, अण्णा सुरवसे, अशोक चमकुरे, ज्ञानेश्वर मोरे, नवनाथ सूरवसे, ज्योतीराम जाधव, विजय श्रीमंगले, अंकुश पवार यांनी सहकार्य केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR