24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरमाझं लातूर परिवार समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

माझं लातूर परिवार समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

लातूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लातूरात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज फेस्टिवल २०२४ सन्मान लातूरकरांचा या कला आणि सांस्कृतीक सोहळ्यात माझं लातूर परिवाराला समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत आयोजकांनी माझं लातूर परिवाराची निवड केली.
बिडवे लॉन्स येथे दोन दिवस चाललेल्या या फेस्टिवलमध्ये चित्रकला, रांगोळी, लोकनृत्य, फॅन्सी ड्रेस, गडकिल्ले प्रदर्शन, शिवगर्जना, तलवारबाजी, दांडपट्टा अशा पारंपरिक स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेच्या शेवटी सन्मान लातूरकरांचा हा विशेष सोहळा घेण्यात आला. यात माझं लातूर परिवाराला गौरविण्यात आले. परिवाराच्या वतीने हा पुरस्कार शिरीषकुमार शेरखाने, डॉ सितम सोनवणे आणि उमेश कांबळे यांनी स्वीकारला.  याप्रसंगी माझं लातूर परिवाराचे सतीश तांदळे यांच्यासह परिवारातील अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते. हा पारंपारिक कला आणि सांस्कृतिक सोहळा विवेक साळुंके, प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR