लातूर : प्रतिनिधी
उदगीरच्या मातृभुमी महाविद्यालयात बी.सी. एस. चे शिक्षण घेणा-या शिवाजी अंकुश वाकळे याचे दि. ८ मार्च रोजी त्याच्या येवरी या गावी जात असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटूंबीयांचा त्याचा अपघातात नव्हेतर घातपातात त्याचा मृत्यू झाल्याचा संशय असून त्या दिवसापासून मयताचे कुटूंबीय याची चौकशीकरून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी करीत आहेत परंतु स्थानिक पोलीस त्यांच्या मागणीला गांभीर्याने घेत नसल्याने मयत शिवाजीच्या वडिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देत माझा आधार तर गेलाच आहे पण निदान मला आमच्या कुटूंबाला न्याय तरी द्या, अशी विनंती केली आहे.
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात मयत शिवाजीचे वडिल अंकुश परबतराव वाकळे वय 55 वर्ष, व्यवसाय शेती, रा. येवरी, ता. जळकोट, जि. लातूर यांनी माझा मुलगा शिवाजी अंकुश वाकळे हा उदगीर येथे बी.सी. एस. मातृभूमी कॉलेज उदगीर येथे द्वितीय वर्षात शिकत होता. तो दररोज येणे जाणे करत असे परंतु दि.८ मार्च रोजी उदगीर येथून गावी येवरी येथे येत असताना त्याची मोटर सायकल क्रं. एम.एच. १२ पी.डब्ल्यु ९५९१ या गाडीवर गावी येत असताना टिप्पर ने त्याला पाठीमागुन धडक देऊन त्यांच्या अंगावरुन गाडी घालून फरार झाला. त्यात फार मोठा अपघात झाला त्यामुळे त्याचा मृत्यु झाला आहे.
सदरील घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन, उदगीर येथे देऊन दि. ९ मार्च रोजी अर्ज दिला. त्याचा एफ.आय.आर दि. १६ मार्च रोजी करण्यात आला. त्यानंतर पोलीस स्टेशनला आम्ही वारंवार जात होतो. परंतु तेथे आम्हाला असे सांगण्यात येत होते की, आम्ही नाकाबंदी केली आहे. आम्हाला टिप्परची माहिती मिळाली आहे. ते टिप्पर आम्ही ताब्यात घेण्यासाठी जात आहोत. असे नाना शिंदे आणि सिरसे साहेब यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत होते. तसेच तुमचा तपास पी.एस.आय. मुंडे साहेब करत आहेत. त्यानंतर आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला गेलो असता आम्हाला उडवा उडवीचे उत्तरे देत आहेत. की सि.सि.टी.व्ही कॅमेरे बंद आहेत. तपास चालू आहे. आद्याप पर्यंत कसलाही तपास लागला नाही. असे सांगण्यात आल्यानंतर आम्ही सि.सी.टी.व्ही फुटेज घेऊन जाऊन दिले. सदर टिप्पर अंधे कन्ट्रकशन चे आहे. त्यांची राजकीय वजन खुप मोठे आहे. असी आम्हाला माहिती मिळाली आहे. माझा एकुलता एक तरुण मुलगा रोड आपघात मृत्यु झाला आहे. त्याबाबत मला शंका येत आहे.
तसेच आमचे भांडण कमलाकर विश्वांभर मुळे व अशोक विश्वांभर मुळे व संतोष अशोक मुळे रा. सिंदगी (बु), ता. अहमदपूर, जि. लातूर यांच्याशी झाले होते. यांनी आम्हाला धमकी दिली होती. यांच्यावर आमचा संशय आहे. त्यानां मोहन भांगे रा. बेळसांगवी ता. जळकोट, जि. लातूर हा आमची पुरेपूर माहिती देत होता. म्हणून माझ्या मुलाचा घात झाला आहे. मला न्याय किंवा कसलाच प्रतिसाद मिळत नाही. मी कोणाकडे न्याय मागायचा तरी आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की, माझा आधार गेला आहे. मला न्याय मिळवूर द्यावा ही नम्र विनंती असे निवेदनात म्हंटले आहे.