मुंबई : प्रतिनिधी
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. नाना पाटेकर यांची ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत चांगली मैत्री होती. अशोक सराफ यांनी पाटेकरांच्या निधनावर प्रतिक्रिया देत भावूक झाले.यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अशोक सराफ यांनी एका प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सराफ यांनी बातमी ऐकूण धक्काच बसला. सराफ म्हणाले, ‘सर्वात वाईट गोष्ट आहे. मला यावर विश्वास ठेवता येणार नाही. माझा अत्यंत जवळचा मित्र होता. माझी आणि त्याची एकत्र सुरुवात झाली. आम्ही एकत्र नाटक केले होते. त्याने ते नाटक केल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्याच्याविषयी.. काय काय सांगणार. मागील काही दिवसांपासून त्यांच्यासोबत बोलणे झालेले नाही. बरेच दिवस झाले, त्याची भेट झाली नव्हती. परंतु आम्ही चांगले मित्र होतो. त्याचे निधन हे अत्यंत दु:खद आहे. मला अजूनही विश्वास होत नाही. इतक्या ताकदीचा माणूस, शारिरीक, मानसिकरित्या मजबूत माणूस गेला. माझ्या जिवाभावाचा मित्र गमावला. हे दु:ख कायम राहील’.
‘आमची मैत्री खूप वेगळी होती. इतकी चांगली होती की, त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. तो माझी मालीश करायचा. हातपाय दाबयाचा. त्यावेळी मी खिशात दोन रुपये टाकायचो. नंतर तो मुकाट्याने पुढे जायचा. त्याने कधी स्वत:चा स्टेटस दाखवला नाही. तो इतका मोठा झाला, तरी त्याचा मोठेपणा दाखवला नाही. त्याची ती वृत्ती कमी झाली नाही. भावापेक्षा मित्र गमावाल. बाहेरून रागीट दिसणारा, पण आतून अत्यंत कोमल असा माणूस होता, असे सराफ यांनी पुढे सांगितले.
















