21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमाझ्या नादी लागू नका; मनोज जरांगेंचा इशारा

माझ्या नादी लागू नका; मनोज जरांगेंचा इशारा

बीड : बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आहे. माझ्या नादी लागू नका, तुम्ही गोडीगुलाबीने तुमचं काम करा. जर तुम्ही हे नाही दिले मग मात्र मी २८८ उमेदवार महाराष्ट्रात सर्व जाती-धर्माचे उभे करणार. तुमचा कार्यक्रमच लावणार, सोडणार नाही असे म्हणत निवडणुकीच्या निकालावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, बीडमध्ये अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी वाजली आहे. सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा जवळपास ७ हजार मतांनी पराभव केला.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, मराठ्यांची भीती निर्माण झाली हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आरक्षण देऊन त्यांना किंमत आणणार आहे. पुढचा विषय कोण निवडून आलं आणि कोण पडले? तर त्यात कुठे आम्हाला आनंद आहे.

राजकारण हा माझा मार्ग नाही आणि माझ्या समाजाचाही नाही. त्या गुलालात आम्हाला आनंद नाही, आमच्या आरक्षणाच्या गुलालात आम्हाला आनंद आहे. मी राजकारणात नाही. कोणालाही पाडा असे म्हटलेले नाही. आम्ही काय सांगितले, कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा पण यावेळेस असे पाडा की मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे. समाजाने ठरवलं आणि त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी होती.

२८८ उमेदवार उभे करणार
माझ्या नादी लागू नका, तुम्ही गोडीगुलाबीने तुमचे काम करा. जर तुम्ही हे नाही दिलं मग मात्र मी विधानसभेला २८८ उमेदवार महाराष्ट्रात सर्व जाती-धर्माचे उभे करणार. तुमचा कार्यक्रमच लावणार, सोडणार नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन बनवणार, गोरगरिबांसाठी बनवणार. ८ जूनला आमरण उपोषणाला बसत आहे. शिंदे सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असे जरांगे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR