24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमाढा, सोलापुरासह बारामतीही जिंकणार

माढा, सोलापुरासह बारामतीही जिंकणार

आम्हाला ईडी-बिडीची भीती नाही, जयसिंह मोहिते पाटील
अकलूज : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांनी आधीच सांगितले असते तर आम्ही धैर्यशील मोहितेंना निवडणुकीत उभेच राहू दिले नसते. पण आता वेळ निघून गेली, असे मोठे वक्तव्य विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी केले. आम्हाला ईडी-बिडीची भीती नाही. आता माढाच नव्हे तर सोलापूर आणि बारामतीही जिंकणार, असे त्यांनी बोलून दाखविले.

माढ्यामधून भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर मोहिते पाटील गट नाराज झाला. माढ्यामधून इच्छुक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली आणि माढ्यातील राजकीय चक्रे वेगाने फिरू लागली. धैर्यशील मोहिते पाटील हेच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असतील, हे निश्चित झाले आहे. त्यानंतर जयसिंह मोहिते पाटील यांनी भूमिका जाहीर केली.

…तर गट संपला असता
रणजितसिंह मोहिते पाटील यांना मंत्री करण्यासाठी थांबलो असतो तर मोहिते पाटील गट संपला असता, असे जयसिंह मोहिते पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला खूप मदत केली. शंकर सहकारी साखर कारखाना अडचणीत होता, तेथे फडणवीस यांनी मदत केली. सुमित्रा पतसंस्थेचे १ हजार कोटी रुपये गेल्या १० वर्षात परत केले. आता फक्त ५५ कोटी रुपये राहिले आहेत. आमच्या सर्व संस्था चांगल्या सुरू आहेत. त्यामुळे आम्हाला इडी-बिडीची भीती नाही, असेही जयसिंह मोहिते पाटील म्हणाले.

५ आमदारांचा दाखला
देऊन चूक केली
जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की, भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देताना ५ आमदार पाठीशी असल्याचे सांगितले, पण ती त्यांनी चूक केली. आता माढा लोकसभेच्या गुलालासोबत सोलापूर आणि बारामतीचा गुलालही महविकास आघाडीचा असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR