29.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रमाणिकराव कोकाटे यांना वेगळा न्याय का?

माणिकराव कोकाटे यांना वेगळा न्याय का?

जितेंद्र आव्हाड यांचा सवाल; राजीनाम्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर विरोधकांकडून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, राज्यातील मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणा-या सदनिकांची बनावट कागदपत्रे तयार करून त्या मिळवल्याचा आरोप कृषिमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्यावर करण्यात आला आहे. याच प्रकरणी दोघांनाही प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३ मार्चपासून सुरू होणार आहे.

या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ कामगार सल्लागार समितीची बैठक होत आहे. या बैठकीला विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित नाहीत. मात्र जितेंद्र आव्हाड हे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. याविषयी माहिती त्यांनी दिली आहे.

नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना एका जुन्या केसच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. सुनील केदार आणि राहुल गांधी यांना एक वेगळा न्याय आणि सत्ताधारी माणिकराव कोकाटे यांना वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे.

नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी ३० वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण ‘व्हीयू अपार्टमेंट’मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या.

यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी (दि. २०) या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR