24.9 C
Latur
Monday, May 26, 2025
Homeसोलापूरमानकऱ्यांच्या घरी दिवे प्रज्वलित करुन श्री सिध्देश्वर यात्रेस प्रारंभ

मानकऱ्यांच्या घरी दिवे प्रज्वलित करुन श्री सिध्देश्वर यात्रेस प्रारंभ

सोलापूर : ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. यात्रेतील प्रमुख मानकरी दर्गोपाटील, धुम्मा, मुस्तारे, मसरे, कळके, हब्बू यांच्या घरी दिवे प्रज्वलित करून तसेच यात्रेचे प्रमुख हिरेहब्बू यांचे पाद्यपूजन करून यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी मानकरी सुहास दर्गोपाटील यांच्या घरी दिवे प्रज्वलित करण्यात आले.

तद्वंतर यात्रेस सुरुवात केली जाते. यावेळी शेवया, पापड, लाल तिखट, काळा तिखट, सांडगे, सडीचे गहू, नकुल्या आदी पदार्थ बनवून यात्रेचे प्रारंभ केले जाते. दरम्यान, ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर यात्रेतील विविध धार्मिक विधींना परंपरेनुसार प्रारंभ झाला.

दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी भाविकांना प्रसाद वाटप केला गेला. सदरची ही परंपरा वर्षानुवर्षे अखंडपणे सुरू आहे.यावेळी महानंदा दोंपाटील, पनंजय बंडे, प्रशांत बंडे, श्रुती बंडे, प्राजका हेले, पदमावती दर्गोपाटील ,राजशेखर हिरेहब्बू, राजू हब्बू, अमित हब्बू,तुकमाळी, तेजश्री दर्गोपाटील, महादेवी दर्गोपाटील, स्वप्ना दर्गोपाटील, श्वेता दर्गोपाटील, संतोषी भांजे, श्रुती बंडे, रतन मानवी, सुमन शेट्टी, आदी उपस्थित होत्या. यावेळी, शिवज्ञा दर्गोपाटील या चिमुकल्यांचाही समावेश होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR