लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात मोठया प्रमाणात फळ, भाज्या विके्रते रस्त्यावर गाडे लावून, रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करतात. व्यवसाय करण्यासाठी वस्तूची विक्री करताना वापरले जाणा-या वजन काटयाच्या मापात पाप करून वस्तूची सर्रास विक्री होत आहे. याकडे वजन काटे, मापे तपासणा-या यंत्रणेचे साफ दुर्लक्ष असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लातूर शहरात गंजगोलाई, रयतू बाजार, तसेच लातूर शहराच्या चारही बाजूने मोठया प्रमाणात व्यवसायीकांनी आपले बस्तान तयार केले आहे. फळे १०० रूपयांना तिन किलो, ५० ला दोन किलो, भाज्या विक्री करताना वापरले जाणारे पासन बरोबर नसते. पासन बरोबर असले तर त्यासाठी वापले जाणारे माप कांही लोखंडी, तर कांही दगड, धोडयांचे तयार केले जाले. असा प्रकार सर्रासपणे लातूर शहरात सुरू आसून याला आळा बसणार का असा प्रश्न सामान्य ग्राहकांच्याकडून विचारला जात आहे. मात्र शासकीय यंत्रणा डोळे मिटून गप्प असल्याने असे प्रकार वाढत आहेत.