30.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रमार्च महिन्यात रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा

मार्च महिन्यात रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा

पुणे : गेल्या काही वर्षांत कुस्ती क्षेत्रामध्ये वाद निर्माण झाले असून दोन संघटना झाल्याने दोन वर्षांपासून दोन्ही संघटनांकडून वेगवेगळ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यात येत आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघ यांच्यात वाद सुरू आहे. याबाबत न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे. असे असताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून येत्या २६ ते ३० मार्चला कर्जत जामखेड येथे ६६वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

दरम्यान, पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी याबाबत घोषणा केली. नुकताच कुस्तीगीर संघाच्या वतीने अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ झाला. त्यानंतर आता कर्जत जामखेड येथे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. यामुळे आता यावर्षी दोन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होताना पाहायला मिळणार आहेत.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत राजकारण बाजूला ठेवणार : यावेळी रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने या ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने २६ ते ३० मार्च २०२५ दरम्यान दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR