22 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeलातूरमालमत्ता कर वसूलीसाठी मनपाची धडक जप्­ती मोहिम

मालमत्ता कर वसूलीसाठी मनपाची धडक जप्­ती मोहिम

लातूर : प्रतिनिधी
कर संकलन व कर आकारणी विभाग लातूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने विविध सुट योजना देऊनही काही थकबाकीदार टॅक्स भरणा करण्यास  टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्यावर मनपा मार्फत धडक जप्ती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार दि. १३ फेबुवारी रोजी क्षेत्रीय कार्यलय ए, बी, सी, डी च्­या कार्यक्षेत्रामध्­ये मालमत्ताकर व पाणी पट्टी कराच्­या वसूलीसाठी नियुक्­त करण्­यात आलेल्­या वसूली पथकामार्फत कार्यवाही करण्­यात आली आहे.
क्षेत्र क्रं. ए:- थकीत मालमत्ताकर ३७२४३७ रुपये, ३ नळ जोडणी बंद करण्­यात आले. तसेच  ८१८३७ रुपये थकीत कर वसूलीसाठी एक दुकान सील करण्­यात आले. क्षेत्र क्रं.बी:- थकीत मालमत्ताकर  २४४७१९ रुपये दोन गोडाऊन सीलची कार्यवाही करण्­यात आले. क्षेत्र क्रं.सी:- थकीत मालमत्­ताकर व पाणी पट्टी कर ७३१२९९ रुपये वसूलीसाठी एकूण १३ नळ जोडणी बंद करण्­यात आले. क्षेत्र क्रं.डी:- थकीत मालमत्ताकर व पाणी पट्टी कर २७४२७२ रुपये वसूलीसाठी एकूण ३ नळ जोडणी बंद करण्­यात आले.
या पुढेही थकीत कराच्­या वसूलीसाठी नियुक्­त पथकामार्फत जप्­तीची कार्यवाही तिव्र करण्­यात येणार असून सदर कार्यवाही अंतर्गत मालमत्ता सील करणे, आटकाव करणे, नळ कनेक्­शेन बंद करणे इत्­यादी कार्यवाही करण्­यात येणार असून मालमत्ता जप्­त किंवा सील करून मुदतीमध्­ये मालमत्ताधारकांनी कर भरणा न केल्­यास अशा मालमत्ताधारकांच्­या मालमत्­तेचा  लिलाव, विक्री करून कर वसूल करण्­यात येणार आहे. तरी  व्­याज, शास्­ती माफी योजनेचा लाभ घेऊन आपल्­याकडे देय असलेल्­या कराचा भरणा करावा.  व जप्­तीसारखी कटू कार्यवाही टाळावी, असे आवाहन उपायुक्त (महसुल) डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR