24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमालाड परिसरात भीषण अपघात; २० व्या मजल्यावरून पाच मजूर कोसळले, तिघांचा मृत्यू

मालाड परिसरात भीषण अपघात; २० व्या मजल्यावरून पाच मजूर कोसळले, तिघांचा मृत्यू

मालाड येथील दुर्घटना

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या मालाड परिसरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मालाडमध्ये काम सुरू असलेल्या इमारतीमधून पाच मजूर खाली पडल्याची धक्कादायक घडना घडली. या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला असून इतर मजुरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेची चौकशी सुरू केली. या घटनेनंतर इमारतीच्या परिसरात एकच गोंधळ उडाला.

मालाड पूर्व येथील नवजीवन एसआरए प्रकल्पाच्या इमारतीचे काम सुरू असताना दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात पाच मजूर इमारतीवरून खाली कोसळले. त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मालाड पूर्व येथील नवजीवन इमारतीमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग कोसळला. यावेळी तिथे काम करत असलेले पाच मजूर देखील खाली कोसळले. या अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR