20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रमिरजेत शिवसेना पदाधिका-यावर जीवघेणा हल्ला

मिरजेत शिवसेना पदाधिका-यावर जीवघेणा हल्ला

मिरज : मिरजेत आर्थिक वादातून शिवसेना शिंदे गटाचा समन्वयक मतीन दाऊद काझी (वय ३२) याच्यासह हॉटेलचालक दाम्पत्यावर हॉटेलमध्ये कोयत्याने हल्ला करण्यात आला. यात मतीन काझी याच्यासह हॉटेलचालक व त्यांची पत्नी जखमी झाले.

या घटनेमुळे संतप्त काझी समर्थकांनी एजाज शेख व त्याच्या साथीदारांच्या घरावर हल्ला चढवून मोडतोड केली. दोन गटांत राड्यामुळे मिरजेत काहीकाळ तणाव होता.
मिरजेत टाकळी रोडवर रवींद्र येसुमाळी यांचे रस्सा नावाचे हॉटेल आहे.

हॉटेलचालक येसुमाळी यांनी सय्यद या कामगाराचा पगार दिला नसल्याचा वाद सुरू होता. या वादातून मिरजेतील एका खून प्रकरणातील आरोपी एजाज शेख व त्यांचे साथीदार अमन गोदड, सोहेल नदाफ, शंकर रिक्षावाला व शिव अथणीकर यांनी शनिवारी रात्री हॉटेलवर जाऊन जोरदार राडा केला. हॉटेलचालक रवींद्र येसुमाळी व त्यांची पत्नी वैशाली येसुमाळी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.

यावेळी शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी मतीन काझी याने मध्यस्थीचा प्रयत्न केल्याने हल्लेखोरानी काझी याच्याही हातावर कोयत्याने हल्ला केल्याने काझी याच्यासह तिघे जखमी झाले. सर्वांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये नेण्यात आल्यानंतर काझी समर्थकांनी सिव्हील आवारात मोठी गर्दी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR