23.7 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमिशिगन गोळीबाराने हादरले, १० जण जखमी

मिशिगन गोळीबाराने हादरले, १० जण जखमी

वॉशिंग्टन : अमेरिकेत गोळीबाराची आणखी एक घटना समोर आली आहे. शनिवारी संध्याकाळी मिशिगनमधील वॉटर पार्कमध्ये एका व्यक्तीने गोळीबार केला, ज्यात दोन मुलांसह दहाजण जखमी झाले आहेत.

ऑकलंड काउंटीचे शेरिफ मायकेल बाउचार्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर हल्लेखोराला पोलिसांनी घेरले असता तो एका घरात लपला, मात्र, नंतर हल्लेखोर मृतावस्थेत आढळून आला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सुरक्षा अधिका-यांनी घटनास्थळावरून एक हँडगन आणि तीन रिकामी मॅग्जिन जप्त केली. हल्लेखोर आपल्या वाहनातून वॉटर पार्कजवळ आला आणि गाडीच्या बाहेर पडून सुमारे २० फूट अंतरावरून गोळीबार केला. हल्ल्यामागचे कारण अद्याप समोर आले नसून सुरक्षा अधिकारी तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR