24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरमी ईडीला घाबरत नाही, काँग्रेस माझ्या रक्तात

मी ईडीला घाबरत नाही, काँग्रेस माझ्या रक्तात

सोलापूर : काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपचा मार्ग धरला. त्यामध्ये अशोक चव्हाणांसारख्या बड्या नेत्याचाही समावेश आहे. त्यांच्यामागोमाग काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यादेखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा महिनाभरापासून रंगली आहे. मात्र आता या सर्व चर्चांवर प्रणिती शिंदे यांनी ‘मी ईडीला घाबरत नाही, काँग्रेस माझ्या रक्तात आहे’ असे म्हणत मौन सोडले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या तारखा या आठवड्यात जाहीर होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. त्याचदरम्यान पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग वेगाने सुरू आहे. भाजपमध्ये तर येणा-यांची संख्या वाढतच चालली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभेतील गावभेटीचा सपाटा लावला आहे. त्यावेळी प्रणिती शिंदे यांनी भाजपवर सडकून टीका केली. सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून मी उमेदवार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. पण माझ्या रक्तातच काँग्रेस आहे.

माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून मी काँग्रेसमध्ये नाही तर सर्वधर्मसमभाव या विचारावर माझा विश्वास आहे. मी कामावर विश्वास ठेवते. मी लोकशाहीवर विश्वास ठेवते म्हणून मी काँग्रेसमध्ये आहे. मी काही ईडीला भीत नाही. माझ्याकडे कारखाना नाही, संस्था नाही. नशीब शिंदे साहेब त्यात पडले नाहीत. त्यामुळे मला ईडीची कसलीही भीती नाही. मी दिलखुलासपणे भाजपविरुद्ध बोलणार, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR