24 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रमुंंबईकरांची चिंता मिटली

मुंंबईकरांची चिंता मिटली

शहराला पाणी पुरवठा करणारी ३ धरणे भरली

मुंबई : मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून, आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांपैकी ३ धरणे पूर्णक्षमतेने भरली आहेत. मोडक सागर, तानसा आणि विहार धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून उर्वरित ४ धरणेही लवकरच भरतील अशी आशा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे

ताज्या आकडेवारीनुसार मुंबई शहराला पाणी पुरवठा करणा-या ७ धरणांमध्ये एकूण ९५.२७ टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये विहार – १०० टक्के, मोडक सागरमध्ये १०० टक्के आणि तानसा – ९८.५३ टक्के भरले आहे. तर तुलसी जलाशयात ९७.७१ टक्के, अप्पर वैतरणा धरणात ९४.२७ टक्के, मध्य वैतरणा – ९७.६१ टक्के, भातसा – ९३.२३ टक्के भरले आहे. मोडकसागर, विहार ही धरणे पूर्णक्षमतेने भरली आहेत, तर तानसा धरण कोणत्याहीक्षणी भरण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR