29.2 C
Latur
Monday, April 14, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईकरांचा प्रवास होणार स्मार्ट

मुंबईकरांचा प्रवास होणार स्मार्ट

तिकिटासाठीची रांग टळणार; लॉन्च होणार मुंबई-१ कार्ड
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईकरांसाठी मोठी घोषणा केली. आता मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच स्मार्ट कार्ड मुंबई-१ सुरू केले जाणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यासमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली. या कार्डद्वारे मेट्रो, मोनो रेल, लोकल ट्रेन आणि बसमध्ये सहज प्रवास करता येऊ शकतो. कार्डची रचना पुढील एका महिन्यात अंतिम केली जाणार आहे.

केंद्र सरकारने मुंबई लोकल ट्रेनसाठी २३८ नवीन वातानुकूलित ट्रेनला मान्यता दिली आहे. मुंबईतील गुंतवणुकीबद्दल बोलताना वैष्णव म्हणाले की, एकट्या मुंबईत १७ हजार कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. यामुळे शहराची रेल्वे व्यवस्था खूप आधुनिक स्वरुपाची असणार आहे. त्यातच महाराष्ट्रातील रेल्वेच्या विकासासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. मुंबईतील लोकल ट्रेन सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. नवीन गाड्या आल्याने प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबई-१ कार्डमुळे लोकांना वेगवेगळी तिकिटे खरेदी करण्याच्या त्रासापासून सुटी मिळेल, असे म्हटले.

सार्वजनिक वाहतुकीत
मुंबई-१ कार्ड उपयुक्त
मुंबई-१ कार्ड सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीत उपयुक्त ठरणार आहे. एकाच कार्डने सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येईल. यामुळे वेळ वाचेल आणि प्रवासही सोपा होईल. त्यामुळे येणारे दिवस मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी खूप सोयीस्कर असणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR