25.3 C
Latur
Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईतील ५० रुग्णालये उडवून देण्याची धमकी

मुंबईतील ५० रुग्णालये उडवून देण्याची धमकी

व्हीपीएन नेटवर्कचा वापर करून पाठविला ई-मेल
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील अनेक प्रसिद्ध रुग्णालयांत धमकीचे ई-मेल आले आहेत. ई-मेल पाठवणा-याने रुग्णालयांच्या बेड आणि बाथरूमच्या खाली बॉम्ब ठेवून रुग्णालय उडविण्याची धमकी दिली आहे.

धमकीचा ई-मेल पाठवणा-याने आपली ओळख लपविण्यासाठी व्हीपीएन नेटवर्कचा वापर करून सर्व ई-मेल पाठवले आहेत. हा ई-मेल मुंबईतील जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि अन्य हॉस्पिटलमध्ये आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

एकाच ई-मेलमध्ये लिहिलेला हा धमकीचा ई-मेल ५० हून अधिक रुग्णालयांना पाठवण्यात आला आहे, असे एका पोलिस अधिका-याने सांगितले. रुग्णालयांना धमकीचा ई-मेल मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. यानंतर पोलिस आणि बॉम्ब निकामी पथकाने रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

रुग्णालयांपाठोपाठ आता महाविद्यालयांनाही धमकीचे ई-मेल आले आहेत. मुंबईच्या हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये धमकीचा ई-मेल आला. ई-मेल करणा-याने कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने जवळच्या पोलिस स्टेशनला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाचे अधिकारी आले आणि त्यांनी तपास केला पण काहीही संशयास्पद आढळले नाही.

प्रकरणाचा शोध सुरू
मुंबईतील अनेक नामांकित रुग्णालयांना त्यांच्या ई-मेल आयडीवर हा धमकीचा ई-मेल आला आणि धमकीचा ई-मेल बीबल डॉट कॉम नावाच्या वेबसाइटचा वापर करून पाठवण्यात आला. धमकीचा ई-मेल पाठवणारी व्यक्ती अद्याप सापडलेली नाही. धमकीचा ई-मेल पाठवण्यामागचा हेतू काय होता, याचा पोलिस शोध घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR