27.5 C
Latur
Wednesday, October 8, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईत ईडीची ८ ठिकाणी छापेमारी

मुंबईत ईडीची ८ ठिकाणी छापेमारी

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत सक्तवसुली संचालनालयाने ८ ऑक्टोबर रोजी तब्बल ८ ठिकाणी छापेमारी केली. मुंबईत ही मोठी कारवाई मनी लाँड्रिंग प्रकरणी करण्यात आली आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या मोठ्या कारवाईचा संबंध हा ड्रग तस्करी नेटवर्कशी संबंधित आहे.
सक्तवसुली संचालनालय मुंबई झोनल कार्यालयाने पीएमएलए २००२ च्या कायद्याअंतर्गत ही कारवाई केली आहे. याबाबत अधिका-यांनी सांगितले की, ही कारवाई फैसल जावेद शेख आणि त्याची सहकारी अल्फिया फैसल शेख यांनी ड्रग्जच्या अवैध नेटवर्कद्वारे जमवलेल्या संपत्ती जप्त करणे आणि मनी लाँड्रिंगचा माग काढण्यासाठी करण्यात आली आहे.

ईडीच्या प्राथमिक चौकशीत फैसल जावेद शेख हा सलीम डोलाकडून एमडी ड्रग खरेदी करत होता. सलीम डोला हा ड्रग तस्कर असून त्याला मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. डोला हा अनेक एजन्सीजच्या रडारवर आहे. तो अमली पदार्थाच्या तस्करीतला आणि त्याबाबतच्या मोठ्या आर्थिक घडामोडींमधला एक महत्त्वाचा सिंडिकेट आहे. एनसीबीने त्याची माहिती देणा-याला बक्षीस जाहीर केले आहे.

ईडीची आजची कारवाई ही ड्रग संदर्भातील मोठ्या मनी लाँड्रिंगवरील मोठी कारवाई म्हणून गणली जात आहे. या कारवाईद्वारे मुंबई आणि संबंधित भागात ड्रग्जचे सिंडिकेट चालवणा-यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंगळवारी ईडीने दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, हरियाणा आणि मुंबई येथील १५ ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. या ठिकाणांवरून ड्रग सिंडिकेटला तांत्रिक मदत मिळत होती असा दावा ईडीने केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR