मुंबई : रविवारी पहाटे मुंबईतील अंधेरी परिसरात रस्त्यावर गळती होणा-या गॅस पाइपलाइनला आग लागल्याने तीन जण भाजले, असे एका अधिका-याने सांगितले. या घटनेत दोन वाहनांचेही नुकसान झाले, असे त्यांनी सांगितले.
अग्निशमन अधिका-यांनी सांगितले की, अंधेरी (पूर्व) परिसरातील तक्षशिला येथील गुरुद्वाराजवळील शेर-ए-पंजाब सोसायटी येथे रस्त्याच्या मधोमध जाणा-या महानगर गॅस लिमिटेडच्या मोठ्या प्रमाणात गळती होणा-या पुरवठा पाइपलाइनमध्ये पहाटे १२.३५ वाजता आग लागली. दुचाकीस्वार अरविंदकुमार कैथल (२१), अमन हरिशंकर सरोज (२२) हे ५० टक्के भाजले आणि ऑटोरिक्षाचालक सुरेश कैलास गुप्ता (५२) हे २० टक्के भाजले, असे त्यांनी सांगितले.