मुंबई : मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात चाळीची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातील चाळीचा काही भाग कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबईच्या अँटॉप हिलच्या विजयनगर येथील पंजा गल्लीतील ही घटना समोर आली आहे. दुस-या आणि तिस-या मजल्यावरील भिंत कोसळून ही दुर्घटना घडली आहे. शोभादेवी मौर्य वय ४५ आणि झाकिरूनिसा शेख वय ५० वर्ष अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. या दोन महिलांना उपचारासाठी सायन रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्यांना मयत घोषित करण्यात आले.