25.6 C
Latur
Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत ठाकरे गटाचे परब, अभ्यंकर विजयी

मुंबईत ठाकरे गटाचे परब, अभ्यंकर विजयी

भाजपला मोठा धक्का, कोकणात भाजपच्या डावखरेंची हॅट्ट्रिक
मुंबई : प्रतिनिधी
मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाचे अ‍ॅड. अनिल परब यांचा २६ हजार २६ मतांनी विजय झाला. तसेच शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाच्याच जगन्नाथ अभ्यंकर यांनी भाजपला धक्का देत ४ हजार ८३ मतांनी विजय मिळविला. मुंबई पदवीधरमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत होती. मतदारांनी भाजपला नाकारले असून उद्धव ठाकरेंवर पुन्हा विश्वास व्यक्त केल्याची प्रतिक्रिया वरूण सरदेसाई यांनी व्यक्त केली.

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या ४ मतदारसंघांसाठी २६ जून रोजी मतदान पार पडले होते. यात मुंबईतील दोन्ही जागांवर ठाकरे गटाने बाजी मारली तर कोकण पदवीधरमधून भाजपचे निरंजन डावखरे यांनी एकतर्फी विजय मिळवित सलग तिस-यांदा विजयी होत हॅट्ट्रिक साधली. त्यांनी कॉंग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव केला.
नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गट, ठाकरे गटासह अपक्ष कोल्हे आणि अजित पवार गटात लढत झाली. यामध्ये शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर आहेत. सुरुवातीपासून दराडे, ठाकरे गटाचे संदीप गुळवे आणि अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात चुरस पाहायला मिळाली. मात्र, यात दराडे यांनी आघाडी घेतली.

बालेकिल्ला राखण्यात
ठाकरे गट यशस्वी
मुंबईत अनिल परब आणि जगन्नाथ अभ्यंकर यांच्या विजयामुळे शिवसेना ठाकरे गटाला मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम राखण्यात यश मिळाले. मुंबई फक्त शिवसेनेचीच असल्याचे सांगत अनिल परब म्हणाले की, शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची हे सिद्ध झाले आहे. मुंबईचा मतदार शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मागे उभा आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचेही आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR