मुंबई : प्रतिनिधी
‘ग्लोबल आयकॉन’ प्रियंका चोप्रा गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहे. पती निक जोनससोबत ती सुखाचा संसार करत आहे. प्रियंका हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्येही काम करत आहे. मात्र आता ती एका साऊथ प्रोजेक्टसाठी भारतात आली आहे. नुकतीच ती मुंबईतील प्रायव्हेट विमानतळावर दिसली. पीसी बाहेर येताच तिची झलक पापाराझींनी कॅमे-यात कैद केली.
प्रियंका चोप्रा नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली. ब्लॅक क्रॉप टॉप, प्रिंटेड पँट आणि मॅचिंग जॅकेट असा तिचा लूक होता. या को-ऑर्ड सेटमध्ये ती स्टायलिश दिसत आहे. डोळ्यावर गॉगल लावून शानदार ऑडीमध्ये बसून ती गेली. यावेळी प्रियंकाच्या बेली डायमंड रिंगवरही सर्वांच्या नजरा खिळल्या. तिने बेली पिअर्सिंग केल्याचं दिसत आहे. ‘देसी गर्ल’च्या स्टायलिश ऑराकडे सगळे बघतच राहिले.
प्रियंकाच्या बेली रिंगची किंमत तब्बल २.७ कोटी रुपये असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. तिचा एअरपोर्टवरील व्हीडीओ तुफान व्हायरल होत आहे. प्रियंका एस. एस. राजामौलींच्या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तिच्यासह महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहेत. नुकतेच त्यांनी ओडिशात सिनेमाचे शूट पूर्ण केले आहे.