27.3 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शाळांना सुटी

मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शाळांना सुटी

अतिवृष्टीची शक्यता, मुंबईतील पूर्ण शाळा मंगळवारी बंद
नवी मुंबई : प्रतिनिधी
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरी, नवी मुंबई शहरासह ठाण्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. नवी मुंबई शहराबाबतचा निर्णय आयुक्त कैलाश शिंदे यांनी जाहीर केला. त्यामुळे मुंबईतील सर्व माध्यमांच्या शाळा उद्या बंद राहणार आहेत.
हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने इ. १ ली ते १२ वीच्या सर्व माध्यमाच्या/मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना दि. ९ जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या मंगळवार दि. ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयही बंद ठेवण्यात आले.अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री व बावनदी, लांजा येथील मुचकुंदी व काजळी नदी, राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली. जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या दिनांक ९ जुलै रोजी सुटी जाहीर केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR