26.7 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच सोरेन यांना अटक

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच सोरेन यांना अटक

चौकशीनंतर ईडीची कारवाई, चंपाई सोरेन नवे मुख्यमंत्री

रांची : वृत्तसंस्था
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला असून चंपाई सोरेन हे नवीन मुख्यमंत्री असतील. आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे हेमंत सोरेन यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. त्यामुळे झामुमोला मोठा धक्का बसला आहे.

जमिनी घोटाळ््याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. यादरम्यान अटकेची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांना राज्यपाल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्रीपदाची शपथ देऊ शकतात. हेमंत सोरेन यांनी बुधवारी रात्री राजभवन गाठून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

याआधी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र कुटुंबातून विरोधाचा आवाज उठवला जात होता. दरम्यान, झामुमो, काँग्रेस आणि राजद विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत चंपाई सोरेन यांची नेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे सरायकेला मतदारसंघाचे आमदार असून सध्या परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री आहेत. ते झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्षही आहेत. चंपाई सोरेन हे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विश्वासू मानले जातात.

सोरेन यांच्यावर कारवाई
जमीन घोटाळ््याप्रकरणी हेमंत सोरेन यांची ईडीच्या अधिका-यांनी चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्यांना केव्हाही अटक होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR