18.1 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeलातूरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चाकुर येथील महापूजेचे निमंत्रण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चाकुर येथील महापूजेचे निमंत्रण

चाकूर : प्रतिनिधी
चाकूर येथील आझाद चौक येथे दरवर्षी आषाढी शुध्द एकादशी या दिवशी यात्रा भरते. सन २०२४ यावर्षी आषाढी यात्रा बुधवार, दि १७ जुलै, २०२४ रोजी आहे. या दिवशी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते  सपत्नीक श्रीं विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दि २५ जून रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदीर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांचा मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला.  यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन तसेच मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, अ‍ॅड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी यात्रा कालावधीत येणा-या भाविकांसाठी देण्यात येणा-या सोयी-सुविधाबाबत माहिती घेवून आवश्यक त्या सूचना दिल्या. आषाढी यात्रा कालावधी दर्शन रांग, पत्राशेड, दर्शन मंडप, येथे  येणा-या वारकरी भाविकांसाठी  देण्यात येणा-या आवश्यक  सोयी-सुविधांची तसेच यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे याबाबत  केलेल्या नियोजनाची माहिती मंदीर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR