लातूर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाथा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यामांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी १ जानेवारी २०२४ ते १५ फेबु्रवारी २०२४ या कालावधीत राबवण्यात आले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. या अभियानात तालुका, जिल्हा विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रकमेच्या स्वरुपात पारितोषिक देण्यात येतात. आता सन २०२५-२६ मध्येही ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा काही नवनवीन उपक्रमांसह राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील २६६१ शाळांनी नोंदणी करावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात सहभागी होणे अपेक्षित आ.े या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा, अशा दोन वर्गवारीत करण्यात आली आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गासाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल. तर अभियानांतर्गत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळांना रकमेच्या स्वरुपात पारितोषीक देण्यात येतील.
३ नोव्हेंबर रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे या अभियानाची सुरुवात झाली. सदर अभियानाचा कालावधी दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी पुर्ण होईल. दि. ९ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी. त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषीक वितरणाचा समारंभ होईल. तरी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी या अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी केले आहे.

