26.2 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री शिंदेंना केंद्रिय मंत्रिपदाची ऑफर?

मुख्यमंत्री शिंदेंना केंद्रिय मंत्रिपदाची ऑफर?

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. एकनाथ शिंदे राजभवनात गेले, त्यावेळी त्यांच्यासोबत दीपक केसरकरही होते. राजीनामा देऊन राजभवनातून बाहेर येत असताना दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला. नवीन सरकार अस्तित्वात येण्याआधी ती औपचारिकता असते, असं दीपक केसरकर म्हणाले. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. आजपासून ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील असं दीपक केसरकर म्हणाले.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत बैठकीला बोलावलं, तर एकनाथ शिंदे तिथे जातील. दिल्लीतले निरीक्षक इथे आले, तर तो भाजपाचा अंतर्गत विषय आहे, त्याबद्दल मी भाष्य करणार नाही, असं दीपक केसरकर म्हणाले. आम्ही तिघेही एकत्र आहोत, महाराष्ट्राच्या हितासाठी हे सरकार काम करेल, असं दीपक केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे नाराज आहेत का? या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले की, एकनाथ श्ािंदे अजिबात नाराज नाहीत. भाजपचे पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल
सरकार कधी स्थापन होणार? या महत्त्वाच्या प्रश्नावर दीपक केसरकर यांनी नवीन सरकार लवकरच स्थापन होईल, असं सांगितलं. भाजपची गटनेता निवडीसाठी कदाचित उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील. मग पक्ष श्रेष्ठींकडे जातील. पक्ष श्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, त्यानुसार ठरेल, असं दीपक केसरकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR