36.4 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांची लेक दहावी उत्तीर्ण; दिविजाला मिळाले ९२.६० टक्के गुण

मुख्यमंत्र्यांची लेक दहावी उत्तीर्ण; दिविजाला मिळाले ९२.६० टक्के गुण

मुंबई : कॉन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन आज (इयत्ता दहावी) आणि इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेक दहावी परीक्षेत घवघवीत यश घेऊन पास झाली आहे.

यावर्षी आयसीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षा १८ फेब्रुवारी ते २७ मार्च दरम्यान घेण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी सीआयएससीई दहावीचा निकाल ९९.४७ टक्के इतका लागला होता. मात्र यंदाच्या वर्षी मुली ९९.६५ टक्के आणि मुलं ९९.३१ टक्क्यांनी उत्तीर्ण झाली आहेत.

या विद्यार्थ्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेक दिविजा ही पास झाली आहे. यासंदर्भात अमृता फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करताना म्हटले की, सर्वांना अक्षय्य तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर ‘वर्षा’ या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन आनंदाने भरून आले आहे. आमची सुकन्या दिविजा ही दहावी बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे, अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR