22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरमुलांना बाल दम्यापासून सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी : डॉ. भराटे 

मुलांना बाल दम्यापासून सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी : डॉ. भराटे 

लातूर : प्रतिनिधी
दमा हा एक दीर्घकालीन (क्रॉनिक) असा आजार आहे. यामध्ये आपल्या श्वसन मार्गावर परिणाम होत असतो. जो आपल्या वायू मार्गावर परिणाम करतो. दम्यामध्ये श्वसन मार्ग अरुंद आणि सूजयुक्त बनतो. त्यातून अधिक प्रमाणात कफाची निर्मिती होते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागत असतो. दमा हा आजार सर्वच वयाच्या लोकांना होऊ शकतो. यामुळे बालदम्यापासून मुलांना सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन श्वसनविकार व छातीविकार तज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांनी केले आहे.
दम्याचे प्रमुख लक्षण म्हणजे दम किंवा धाप लागणे हे असते. अनेक वेळा मुलास लागलेली धापही खेळल्यामुळे लागली असेल असे पालकांना वाटते त्यामुळे लहान मुलांमधील दमा सहजतेने लक्षात येत नाही. अनेक मुलांना थोडेसे खेळल्यावर कोरडा खोकला येतो. आलेल्या खोकल्याची उबळही भरपूर वेळ असते आणि खोकल्यानंतर श्वास घेताना शिट्टीसारखा आवाजही येऊ शकतो. काही मुलांमध्ये सतत सर्दी होते, नाक चोंदले जाते, दम लागतो, श्वास घेताना त्रास होणे ही लक्षणे असतात तर काही मुलांना वारंवार दम लागतो, छातीत घरघर होते, खोकला होतो, श्वास घ्यायला त्रास होतो, श्वास घेताना आवाज येतो, बोलण्यास त्रास होणे अशी लक्षणे बाल दम्यात मुलांमध्ये दिसू शकतात. प्रत्येक मुलाच्या बाबतीत बाल दम्याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात त्यामुळे पालकांनी तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही डॉ. भराटे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR