25.6 C
Latur
Wednesday, July 3, 2024
Homeलातूरमुलींच्या मोफत शिक्षणाचं काय झालं?

मुलींच्या मोफत शिक्षणाचं काय झालं?

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ जूनपासून राज्यात मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल,अशी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी व नीट परिक्षा गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झालीच पाहीजे, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँगेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दि. १८ जून रोजी येथील छत्रपती शिवाजी महराज चौकात आंदोलन करण्यात आले.
जून महिना सुरु झाला तरी विद्यार्थ्यांची प्रवेशाची लगबग सुरु होते. प्रत्येकजण आपल्या आवडीच्या शाळेत, महाविद्यालयात प्रवेश घेत असतो. महाविद्यालयाच्या भरमसाठ फी मुळे अनेक मुलींना दुय्यम दर्जाचे शिक्षण घ्यावे लागते, किंवा शाळाच सोडावी लागते. काही जणांनी आत्महत्या केल्याचीही घटना घडल्या आहेत.परभणीमध्ये गेल्यावर्षी एका मुलीने महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारकडून मोफत शिक्षणाची मोठी घोषणा केली होती. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ जूनपासून राज्यात मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल, अशी घोषणा केली होती. पण जून महिना अर्धा उलटला पण सरकारचा जीआर निघाला नाही, किंवा अंमलबजावणी झाली नाही. प्रवेशामुळे मुलींना फी भरावी लागत असल्याचे समोर येते. या निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणात आली आहे.
यावेळी लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे, रशिद शेख, मदन काळे, प्रा. माधव गंगापुरे, रघुनाथ कुचेकर, रेखाताई कदम, मनिषा कोकणे, स्नेहा मोटे, कल्पना फरकांडे, बखतावर बागवान, बालाजी कदम, डी. उमाकांत, इरफान शेख, आर. झेड हाश्मी, चंद्रशेखर कत्ते, अ‍ॅड. आशिष चव्हाण, फेरोज पठाण, अ‍ॅड. नागरगोजे, चेतन पाटील, विक्रांत गायकवाड, भगाडे काकासाहेब, भगवान घाडगे, अजहर शेख, काकडे दत्तात्रय, शहादत पठाण, प्रेमचंद पवार, श्रीनाथ काळे, सलाऊद्दीन शेख, फरीद पाशा, पुरोषत्तम पाटील, अक्षय कांबळे, सुमित यादव, ज्योती सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR