24.6 C
Latur
Thursday, February 20, 2025
Homeलातूरमुलींना शिक्षण, परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे 

मुलींना शिक्षण, परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे 

निलंगा :  प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार व्यवसायिक अभ्यासक्रम घेणा-या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग , इतर मागासवर्ग तसेच ज्यांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क ५० टक्के ऐवजी १०० टक्के शुल्क माफ करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून दि ८ जुलै २०२४ रोजी निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे महाविद्यालयाने परीक्षा शुल्क व शिक्षण  शुल्क आकारू नये, अशा आशयाचे निवेदन युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी महावद्यिालयास दिला आहे. महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य माधव कोलपुके यांना देण्यात आला आहे.
व्यवसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण ३६ टक्के इतके मर्यादेत आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यवसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या ५ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकी नुसार शासनाने दि ८ जुलै २०२४ रोजी शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क शंभर टक्के माफ करण्यात आले आहे. तरीही महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीकडून शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क घेतली जात आहे, अशी तक्रार येत असून आपण कोणत्याही विद्यार्थ्यीनीकडून शासनाच्या निर्णयानुसार परीक्षा शुल्क अथवा शिक्षण शुल्क घेऊ नये जर आपल्या महाविद्यालयाकडून शासन निर्णयाची अवहेलना होत असेल तर शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी महाविद्यालयास दिला आहे.
शासनाने महाविद्यालयीन विद्यार्थिनींना शंभर टक्के परीक्षा शुल्क व शक्षिण शुल्क ही योजना जाहीर केली पण विद्यार्थ्यांनीचे फॉर्म शासनाच्या संबंधित विभागामार्फत अपलोड होत नाहीत. संबंधित शासनाच्या विभागाने संबंधित वेबसाईट तात्काळ सुरळीत न केल्यास शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी शासनास दिला आहे. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अमोल ढोरेसिंगे, प्रदीप पाटील अल्पसंख्यांक सेलचे तालुकाप्रमुख लायकपाशा शेख, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी, शहर प्रमुख दैवता सगर, उपतालुकाप्रमुख मंगलबाई कांबळे, उपतालुकाप्रमुख अरुणाताई माने, उपशहरप्रमुख सय्यद रेहाना आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR