27 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeपरभणीमुलीची छेड काढणा-या आरोपीला पकडले

मुलीची छेड काढणा-या आरोपीला पकडले

परभणी : शहरातील नर्सिंग कॉलेज मधून सरकारी रूग्णालयाकडे एकत्रित जाणा-या मुलींपैकी एका मुलीच्या अंगाला हात लावून छेड काढल्याची घटना घडली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्यानंतर शहरात सर्वत्र याच प्रकरणाची चर्चा होत होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी मोहम्मद असलम मोहम्मद सलीम यास अवघ्या काही तासात परळी तालुक्यातील धर्मापुरी येथून ताब्यात घेतले आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले कॉलेजच्या पाठीमागील रस्त्याने इंदीरा गांधी नर्सिंग स्कुल येथून दि.६ रोजी काही विद्यार्थीनी सरकारी रूग्णालयाकडे जात होत्या. यावेळी आरोपी मो. असलम मो. सलीम हा मोटार सायकल क्रमांक एम.एच. २२ बीडी ०३४१ वरून आला व मुली जवळून पुढे निघून गेला. त्यानंतर पुढे जावून मोटार सायकल वळवून आरोपीने परत जात असताना यातील एका मुलीच्या शरीराला नको तिथे हात लावून पळून गेला होता. या प्रकरणी संबंधीत मुलीने दि.७ रोजी नानलपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवरून आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्याने दिवसभर याच प्रकरणाची चर्चा शहरात होताना दिसून येत होती. तसेच समाज माध्यमांवरील अनेक ग्रुपमध्ये देखील हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होता होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरत आरोपी मोहम्मद असलम मोहम्मद सलीम राहणार वांगी रोड परभणी यास परळी येथील धर्मापुरी (जिल्हा बीड) येथून सिनेस्टाईल पध्दतीने घराच्या पत्रावून उडी मारून पाठलाग करून पकडले आहे. ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे व पोलीस उपाधीक्षक शहर दिनकर डंबाळे यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश कांबळे, शोएब पठाण, भगवान सोडगीर, अंबादास चव्हाण आदिंच्या पथकाने केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR