25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमुश्रीफांच्या धमक्यांना मी घाबरत नाही, माझ्यासोबत शरद पवार

मुश्रीफांच्या धमक्यांना मी घाबरत नाही, माझ्यासोबत शरद पवार

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार हे माझ्यासारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागलेत? हे मला कळेनासे झाले आहे, असे वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या वक्तव्याचा नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या समरजितसिंह घाटगे यांनी निषेध केला.

ज्यांनी आतापर्यंत हसन मुश्रीफ यांच्या राजकीय कारकीर्दीत सगळी पदे उपभोगायला दिली, त्यांच्यावरच जातीयवादाचा आरोप कसे करू शकतात? ते सरळसरळ शरद पवार यांना टार्गेट करत आहेत. ज्यावेळी आव्हानांना सामोरे जाण्याची वेळ येते त्यावेळी हसन मुश्रीफ जातीचे कार्ड खेळतात, असा टोमणा समरजितसिंह घाटगे यांनी मारला. त्याचवेळी ‘पवारसाहबसे बैर नहीं। समरजित तेरी खैर नहीं’ असा इशारा देणा-या मुश्रीफांच्या धमक्यांना मी घाबरत नाही, माझ्यासोबत शरद पवार आहेत, असे समरजित यांनी ठणकावून सांगितले.

कोल्हापूरमधील कागलच्या गैबी चौकात मोठे राजकीय शक्तिप्रदर्शन करीत हसन मुश्रीफ यांना तोडीस तोड पर्याय शोधून महाराष्ट्रात परिवर्तनाची ठिणगी पडल्याचे शरद पवार यांनी आत्मविश्वासाने सांगितले. तसेच स्वार्थासाठी लाचारी पत्करलेल्या लोकांना येत्या विधानसभेला त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन करीत मुश्रीफांची विधानसभेची वाट पवार यांनी बिकट केली. पवारांच्या सभेनंतर हसन मुश्रीफ यांनी अल्पसंख्याक व्यक्तीला ते लक्ष्य करीत असल्याची टिप्पणी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR